सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणं आणि त्वचेची काळजी घेणं या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक झाल्या आहेत. पण काही साध्या आणि नैसर्गिक उपायांनी शरीराची देखभाल करणं अगदी शक्य आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी मलायका अरोरा ही तिच्या फिटनेस आणि ग्लोइंग स्किनसाठी ओळखली जाते. वयाच्या ५२ वर्षी देखील ती तिच्या सुंदर, तंदुरुस्त आणि टोनड बॉडीने अनेकांना प्रेरित करते. नियमित व्यायाम आणि चांगला आहार खाते.
अनेक मुलाखतीत तिने सांगितलं की ती कोणतेही क्रॅश डाएट करत नाही.
साधे घरगुती उपाय करुन ती आरोग्याची काळजी घेते. मुलाखतीत तिने तिचे खास मॉर्निंग हेल्थ ड्रिंक देखील शेअर केले, जे तिच्या मते आतड्याच्या आरोग्यासाठी आणि एकूण शरीरासाठी फायदेशीर आहे. पाहूयात या खास गोल्डन ड्रिंकबद्दल.
